३४ वी राजगड प्रदक्षिणा जागा भरल्या. नाव नोंदणी बंद
जागा भरल्या आहेत. नाव नोंदणी थांबवण्यात आलेली आहे. आपण भरभरुन दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार!
एखाद्या किल्ल्यावर गेल्यावर त्याच्या तटावरून फिरताना खाली दिसणारा प्रदेश खुणावतो. डोक्यात विचार येतो की हे तट बुरुज खालून कसे दिसतील? त्यांचे दर्शन किती भव्य असेल. अशी संधी क्वचितच मिळते. खालचा प्रदेश दुर्गम असतो. तिथे जायला वाटा देखील नसतात. पण अशीच एक संधी हा कार्यक्रम घेऊन आलेला आहे. राजगडाचे नुसते खालून दर्शनच नाही तर खालच्या जंगलातून संपुर्ण २० किमी ची प्रदक्षिणा. तेथून दिसणारे ह्या गडाचे दृश्य हे अवर्णनिय आहे. लांबच लांब गेलेली सुवेळाची सोंड! बलाढ्य अश्या दुहेरी तटबंदीची ऊंच संजिवनी माची! दुर्मिळ असा हा अनुभव आयोजित केलाय मुंबईच्या नामवंत ‘दि नेचर लव्हर्स’ या संस्थेने.
१९८६ पासून दि नेचर लव्हर्स, मुंबई हा लोकप्रिय कार्यक्रम पुणे जिल्ह्यातल्या वेल्हा तालुक्यात असलेल्या राजगडावर आयोजित करते आहे. दि नेचर लव्हर्स ही महारष्ट्रातील जुनी, नामवंत तसेच निसर्ग व गिर्यारोहण क्षेत्रातील प्रथितयश संस्था आहे. हा ४ दिवसाचा कार्यक्रम म्हणजे, नाताळची सुट्टी संस्मरणीय करायची एक पर्वणीच आहे. राजगड म्हणजे शिवाजी महराजांची पहीली राजधानी. गडांचा राजा आणि राजांचा गड! त्याची प्रदक्षिणा म्हणजे शौर्य, इतिहास, गिर्यारोहण ह्यांचा त्रिवेणी संगम!
ठळक वैशिष्ठ्ये
- राजगडच्या डोंगरातून विलक्षण अशी २० किमीची प्रदक्षिणा
- लेखक आणि जेष्ठ इतिहास अभ्यासक श्री. आप्पा परब (मुंबई) व श्री. भगवानराव चिले (कोल्हापूर) यांसोबत गडाचा इतिहास उलगडण्याची संधी
- संपुर्ण गड दर्शन
- शहरातील प्रदुषण व गोंधळापासून चार दिवस लांब
- कामाचा ताणतणाव हलका करून एक डोंगर-निसर्गातील अनोखा अनुभव
राजगडावर पाहण्यासारख्या जागा
- पद्मावती माची: सगळ्यात मोठी माची - देवळे, सदर, राजवाड्याचे अवशेष आणि इतर वास्तू
- बालेकिल्ला: गडाचा सर्वोच्च माथा व तिथून दिसणारा लांब लांबचा किल्ल्यांचा प्रदेश, राजवाडा व इतर अवशेष
- सुवेळा माची: ऊगवतीकडची माची, नावाप्रमाणेच सुंदर बांधकाम व आकार, वैशिष्ठ्यपुर्ण हत्ती खडक आणी धालकाठीचा बुरुज
- संजीवनी माची: विहंगम दृश्य, चिलखती तटबंदीचे दुर्मिळ उदाहरण
महत्त्वाची माहिती
तारखा: २५ ते २८ डिसेंबर (मुंबईहून २४ला रात्री ११ वा दादर/गोरेगांव/ऐरोळी)
काठिण्य पातळी: मध्यम (तपशिल खाली)
सुरुवातीचे ठिकाण: गुंजवणे
राहयची व्यवस्था: तंबूंमध्ये
खर्च: खाली वाचा
बसची व्यवस्था: मुंबईवरून आहे (तपशिल खाली)
कार्यक्रम

- २५ डिसेंबर
- सकाळी गुंजवण्याला पोहोचल्यावर चहा, नाश्ता करून गडाकडे कूच
- तज्ञांसोबत गड दर्शन
- लेखक, इतिहास संशोधकांची व्याख्याने व चर्चा
- २६ डिसेंबर
- तज्ञांसोबत गड दर्शन
- तज्ञांचे मार्गदर्शन
- २७ डिसेंबर
- प्रदक्षिणा
- पालखी व दिंडी
- २८ डिसेंबर
- गडावरून ऊतरून गुंजवणे व तिथून आपापल्या गंतव्य स्थानाकडे
काठीण्य दर्जा: मध्यम
या कार्यक्रमात खालील शारिरीक ताकदीच्या गोष्टींचा समावेश होतो.
- पहिल्या दिवशी साधारण २-३ तासांचा चढ
- गड दर्शनासाठी २-४ किमी चे चालणे
- तिसऱ्या दिवशी साधारणपणे २० किमी चे जंगलातून व डोंगर ऊतारावरून पदभ्रमण
- शेवटच्या दिवशी गडावरून २ तासाचे ऊतरणे
कार्यक्रमाचे शुल्क
१८ डिसेंबरपर्यंत सवलतीतला दर
- मोठ्यांना रु ३५०० फक्त
- विद्यार्थांना रु ३२०० फक्त
( हे १८ डिसेंबर पर्यंत सवलतीत कारण डोंगरावर सगळे सामान चढवायचे असते आणि योग्य तयारीकरून कार्यक्रम माफक दरात ठेवायला शक्य होते)
१९ डिसेंवर पासूनचे दर
- मोठ्यांना रु ३८०० फक्त
- विद्यार्थांना रु ३५०० फक्त
प्रवास खर्च
मुंबई-गुंजवणे-मुंबई प्रवास खर्च प्रत्येकी रु.१२००/- रुपये असून मंगळवार २४ डिसेंबर रोजी रात्री ११.०० वाजता दादर (पूर्व) आणि गोरेगाव (पूर्व) येथून ऐरोळी मार्गे बसेस सुटणार आहेत.
यात समाविष्ट गोष्टी:
- गडावरील चहा, नाश्ता, जेवण
- तंबूंमध्ये राहाण्याची व्यवस्था
- गडाच्या तटाखालून मार्गदर्शकांसोबत प्रदक्षिणा
- इतिहास तज्ञांचे, लेखकांची व्याख्याने व त्यांबरोबर गड दर्शन
- पहिल्या दिवशी गुंजवणे गावात चहा, नाश्ता
- शेवटच्या दिवशी गुंजवणे गावात जेवण
- नामवंत गिर्यारोहण शाळांतील कुशल गिर्यारोहकांचे मार्गदर्शन
दि नेचर लव्हर्स हि सेवाभावी संस्था आहे. अश्या लांबच्या डोंगरावर असा कार्यक्रम करणे नक्कीच खर्चिक आहे. संस्थेला या कार्यक्रमातून फायदा फार नसतोच किंबहुना बऱ्याचदा तोटाच सहन करावा लागतो. पण आपल्या समॄद्ध निसर्ग व ऐतिहासिक वारश्याची ओळख सर्वांना व्हावी या ऊद्देश्याने संस्था हा कार्यक्रम सातत्याने करत आहे.
देणगिदार तसेच संस्थेच्या सभासदांकडून आलेल्या देणग्यांमुळे हा कार्यक्रम इतक्या माफक दरात ठेवणे आम्हाला परवडते. त्या सर्वांचे मनापासून आभार.
आमच्या बॅंकेचे तपशिल
जागा भरल्या आहेत. नाव नोंदणी थांबवण्यात आलेली आहे. आपण भरभरुन दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार!
Bank Name: Union Bank of India
Branch: Malad (West)
IFSC Code: UBIN0531804
Account Name: The Nature Lovers
A/c No: 318002010010443
A/c Type: Savings
महत्त्वाचे: प्रदक्षिणार्थिचे नाव ट्रान्सफर करताना नोंद करायच्या जागी टाकावे, म्हणजे आम्हाला कुणाचे पैसे आलेत ते कळेल.
नाव नोंदणी
जागा भरल्या आहेत. नाव नोंदणी थांबवण्यात आलेली आहे. आपण भरभरुन दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार!
- पैसे भरल्यावर नोंदणी फॉर्म भरावा.
- नोंदणी ऑनलाईन आहे - नोंदणी फॉर्म साठी इथे क्लिक करा
- विद्यार्थ्यांसाठी हा फॉर्म बापरा - विद्यार्थ्यांच्या नोंदणी फॉर्म साठी इथे क्लिक करा
कसे पोहोचावे
- गुंजवणे राजगडाच्या पायथ्याचे गाव आहे जिथून चढायला सुरू करतो. गुगल मॅप लिंक.
- कार्यक्रमाला येणाऱ्यांसाठी मुंबईवरून बसेस आयोजित केलेल्या आहेत. प्रवास शुल्क रु १२०० फक्त
- राज्याच्या इतर भागातून येणाऱ्यांसाठी खालील मार्ग ऊपलब्ध आहेत.
- राज्य परिवहन मंडळाच्या बसेस् पुण्याच्या स्वारगेट स्थानकांवरून गुंजवण्यापर्यंत
- पुणे बेंगलोर हायवे वरील नसरापुर (चेलदी फाटा) वरून सहा आसनी
- स्वतःच्या वाहनाने गुंजवणे (वरील गुगल लिंक पहा)
रहायची व्यवस्था
हा कार्यक्रम डोंगराळ प्रदेशात होत असल्याने सुविधांची कमतरता आहे. तरीदेखील शक्य त्या गोष्टी द्यायचा आमचा प्रयत्न असतो. अर्थात, अश्या ठिकाणी रहाणे हा या अनुभवाचा मोठा भाग आहे.
- रहाण्यासाठी तंबुंची व्यवस्था. येताना झोपण्यासाठी हलकी कॅरि मॅट, चादर/शाल घेऊन यावे.
- थंडीच्या तयारीने यावे. कधी कधी चांगलीच थंडी पडू शकते.
- हा पर्यावरण पुरक (इको फ्रेंडली) कार्यक्रम आहे. कृपया येताना ताटली, चमचे, वाटी, चहाचा मग घेऊन यावे.
- पाण्याची बाटली अत्यावश्यक. गडावरच्या टाक्यांमधील पाणी स्वच्छ व पिण्यायोग्य असते. आम्ही त्यात जिवाणूंसाठी औषध घालतो, तसेच गाळून घेतो.
- जेवण मराठी पद्धतीचेच असेल.
- टॉयलेट तंबुची सोय आहे.
बरोबर आणावयाच्या गोष्टी
- बॅकपॅक म्हणजेच पाठुंगळीला घ्यायची पिशवी. इतर प्रकारच्या पिशव्या गडावर चढताना त्रासदायक ठरू शकतात.
- हलकी कॅरी मॅट, स्लिपिंग बॅग, शाल, चादर इत्यादी
- स्वेटर, थंडीचे जॅकेट, माकड टोपी, कॅप
- रुमाल, टॉवेल, पंचा
- डोंगरात टिकतील असे चांगले बूट
- फुल पॅंट, फुल शर्ट किंवा ट्रॅक सुट (प्रदक्षिणेसाठी)
- ओढणी, स्कार्फ (प्रदक्षिणेसाठी)
- पाण्याची बाटली (१ लि)
- नविन बॅटरी सेलची विजेरी (टॉर्च्)
- स्वतःला लागणारी औषधे
- हलके प्लेट, वाटी, चमचा, चहाचा मग
नियम व अटी
डोंगरावरच्या ह्या कार्यक्रमात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांची सुरक्षितता. तसेच हा गड आपल्या इतिहासातील एक पवित्र स्थान आहे. या गोष्टींसाठी खालील नियम व अटींचे पालन अत्यावश्यक आहे. हे न करून सुरक्षिततेला धोका पोहोचेल, गडाच्या पावित्राचे उल्लंघन होईल किंवा इतर कुठल्याही प्रकारे गैर वर्तणुक केल्यास त्या प्रदक्षिणार्थीवर योग्य ती कारवाई करण्याचा हक्क संयोजक तसेच दि नेचर लव्हर्स् संस्थेकडे राखून ठेवलेला आहे.
- प्रदक्षिणा आखून दिलेल्या पायवाटेनेच करावी.
- आपल्या ग्रुप लिडरने तसेच इतर् स्वयंसेवकांनी दिलेल्या सुचनांचे पुर्ण पालन करा.
- संयोजकांचा निर्णय हा सगळ्यांना बंधनकारक असेल.
- गडावर सिगरेट, तंबाखु सेवन तसेच मदिरापानास पुर्ण बंदी आहे.
- कुठल्याही प्रकारच्या कर्कश्य संगित लावणे वा वाजविण्यास परवानगी नाही.
- सर्व महागड्या वस्तू जसे कॅमेरे, दुर्बिणी, दागिने स्वतःच्या जबाबदारीने आणाव्यात.
- प्रदक्षिणेला कुठल्याही प्रकारचे अत्तर, डिओडोरंट, लोशन लावून येऊ नये. त्या वासाने मधमाश्या तसेच इतर किटक, प्राणी आकर्षित होऊ शकतात.
- अठरा वर्षाखालील सर्व प्रदक्षिणार्थींना पालकाची परवानगी असणे बंधनकारक आहे.
- गड स्वच्छ ठेवणे ही आपलीही जवावदारी आहे. कुठल्याही प्रकारचा कचरा इथे तिथे न टाकता आपल्या बरोबर ठेऊन नेमून दिलेल्या ठिकाणीच जमा करा.
- संयोजकांनी सर्वतोपरी काळजी घेतली तरी निष्काळजीपणामुळे किंवा नैसर्गिक कारणांमुळे झालेल्या कुठल्याही दुर्घटनेला संस्था, स्वयंसेवक किंवा संयोजक जबाबदार रहाणार नाही.
- बेजबाबदारपणे वागणाऱ्या तसेच स्वतःला किंवा इतरांना धोका पोहोचू शकेल अश्यारितीने बागणाऱ्यास कार्यक्रमात सहभागी होण्याची परवानगी संयोजक नाकारू शकतात.
- कार्यक्रमाची तसेच बसच्या फीचा परतावा मिळणार नाही.
संपर्क
आमचा ई मेल: thenaturelovers1986@gmail.com
| पुणे | राजगोपाल पाटील | 9823376551 |
| बोरीवली | अभिषेक गुरव | 8286272088 |
| उरण | सई नाईक | 7738244469 |
| माहिम | कक्षा खांडेकर | 98695 30131 |
| पुणे | अमोल पेंडसे | 90110 20492 |
| बोरीवली | ज्योती गुरव | 98214 54057 |
| कोल्हापूर | भगवान चिले | |
| गिरगाव | मिलिंद परांजपे | 98923 37055 |
| मालाड | दिपा वाळवेकर | 93215 13070 |
| ऐरोळी | रचना कुलकर्णी | 98213 42702 |
| पनवेल | नयना | |
| नेरुळ | दत्ता कराडे | 98679 12847 |
| भांडूप | संतोष घाडीगावकर | 98694 49488 |
☎ चौकशी साठी फोन/वॉटस् ऍप: 8286272088/7738244469/9823376551
फेसबुक : https://www.facebook.com/thenaturelovers1982/
ईंस्टाग्रॅम : https://www.instagram.com/thenaturelovers_mumbai/